शब्द त्या आरता लक्ष
425.
शब्द त्या आरता लक्ष त्या परोते ।
लक्षालक्ष जेथे मग्न जाले ॥१॥
तेथे काय आता पुसणे सांगणे ।
भलते आपण जाणताती ॥२॥
ज्याचे जितुके ज्ञान तितुक्यासी देव ।
शब्दाचा निर्वाह आरूताची ॥३॥
आतुरासी बोलता कैचे समाधान ।
म्हणोनिया मौन धरिता भले ॥४॥
पाहावे ते एक सीत चाचपोनी ।
अवघे घाटोनी कोण सिद्धी ॥५॥
बहेणि म्हणे अवघ्या वासनेच्या चेष्टा ।
तेथे ब्रह्मनिष्ठा कासयाची ॥६॥
