तुज ऐसा देव लुच्चा ।
655.
तुज ऐसा देव लुच्चा ।
नाही सच्चा पाहियेला ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेवा ।
बहुत तुवा शिणवीले ॥२॥
गोर्या कुंभाराचे हात ।
तोडिसी भगवंत करणी ऐसी ॥३॥
भोळा भक्त चोखा मेळा ।
पाहासी सुळा देऊ तया ॥४॥
बहिणी म्हणे ऐसी करणी ।
चक्रपाणी उदाराची ॥५॥
