वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

म्हणती तुला दयाघना ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075798 · अभंग क्र. ६५६

656.
म्हणती तुला दयाघना ।
दयाघना परि कोरडी ॥१॥
हरिश्चंद्र तारामती ।
केली माती संसाराची ॥२॥
गोपीचंद राजा भोळा ।
वोस केला गाव त्याचा ॥३॥
एकनिष्ठ भक्त बळी ।
तुवा घातिला पाताळी ॥४॥
बहिणी म्हणे बरे केले ।
नाही आले अनुभवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग