वदनी तुझे नाम अमृत स
814.
वदनी तुझे नाम अमृत संजीवनी । असता चक्रपाणि भय कवण ॥१॥
या जन्ममरणाची कायसी मग चिंता । तुझिया शरणागता पंढरीनाथा ॥२॥
ह्रदयी तुझे रुप बिंबले साचार । तेथे कवण पार संसाराचा ॥३॥
नामा म्हणे तुझे नाम वेळोवेळ । म्हणता कळिकाळ पाया पडे ॥४॥
