गिरीगव्हारे कशासाठी
10.
गिरीगव्हारे कशासाठी । रागे पुरवीली पाठी ॥१॥
ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो का द्वेषी ॥२॥
घर बांधिले डोंगरी । विषया हिंडे दारोदारी ॥३॥
काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥४॥
गंगाजळ हृदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
