वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

अभय उत्तरी संती केले

🙏 3. संत तुकाराम · ABH-079404 · अभंग क्र. ३९८२

3982.
अभय उत्तरी संती केले दान । झाले समाधान चित्त तेणे ॥१॥
आता प्रेमरसे न घडे खंडण । द्यावे कृपादान नारायणा ॥धृपद॥
आले जे उचित देहविभागासी । तेणे पायापासी उभी असो ॥२॥
तुका म्हणे करी पूजन वैखरी । बोबडया उत्तरी गातो गीत ॥३॥

अर्थ :
तू भिऊ नकोस असे अभयाचे उत्तर वचन संतांनी मला दिले त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान झाले. नारायणा आता तुमच्या प्रेमरसामध्ये खंडन पडू नये हेच कृपादान तुम्ही मला दयावे. देवा आमच्या देहाच्या वाटेला जो काही उचित भाग आलेला आहे त्यामुळे खरे तर आम्ही तुमच्या पुढे उभे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी माझ्या वाणीने तुमच्या गुणवर्णनाचे गीत गाऊन तुमची पूजा करीत आहे आणि बोबड्या वाणीनेच तुमचे गीत गात आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग