वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

तया साठी वेचू वाणी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079899 · अभंग क्र. ३९८१

3981.
तया साठी वेचू वाणी । अइको कानी वारता त्या ॥१॥
क्षेम माझे हरीजन । समाधान पुसता त्या ॥धृपद॥
परत्रींचे जे सांगाती । त्यांची याती न विचारी ॥२॥
तुका म्हणे धैर्यवंते । निर्मळ चित्ते सखी ती ॥३॥

अर्थ :
संतांसाठीच आम्ही आमची वाणी खर्च करु आणि त्यांचीच वार्ता आम्ही आमच्या कानांनी ऐकू. माझ्या सर्व हरीजण वैष्णवांचे क्षेम म्हणजे चांगले आहे का हे विचारण्यातच माझे समाधान आहे. जे लोक माझ्या परलोकीचे सोबती आहेत त्यांची जात कुळ मी विचारणार नाही केवळ त्यांच्याकडे हरीभक्त म्हणूनच मी पाहात आहे आणि म्हणूनच त्यांच्या क्षेम समाचाराची वार्ता मी विचारीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे धैर्यवंत आहेत आणि निर्मळ चित्ताचे आहेत तेच माझे सखे आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग