भवाब्धीचे सखोल पाणी
920.
भवाब्धीचे सखोल पाणी ।
बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥
येथे उतार न दिसे कोणा ।
थोरा लहाना नागवण ॥२॥
सत्व कर्मे स्वर्गा जाती ।
तमे पडती अध:पाती ॥३॥
निळा म्हणे रजतमात्मक ।
पावती लोक नरदेहा ॥४॥
920.
भवाब्धीचे सखोल पाणी ।
बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥
येथे उतार न दिसे कोणा ।
थोरा लहाना नागवण ॥२॥
सत्व कर्मे स्वर्गा जाती ।
तमे पडती अध:पाती ॥३॥
निळा म्हणे रजतमात्मक ।
पावती लोक नरदेहा ॥४॥