मुगुट मनोहर कुंडले म
1086.
मुगुट मनोहर कुंडले मकाराकार | कांसे पीतांबर कसियेला ॥१॥
खोविले गोशे स्वार गरुडावर | उठविले भर वैष्णवांचे ॥२॥
केले आचमन तीर्थी त्या तांतडी | आले उठाउठी सिद्धेश्वरी ॥३॥
परमार्थ स्वार्थ जाल्या गुह्य गोष्टी | होताती भेटी ज्ञानदेवा ॥४॥
नामा म्हणे भेटा लहान थोर सारे | जातो ज्ञानेश्वर समाधीसी ॥५॥
