साधनाच्या माजी एक गज
2102.
साधनाच्या माजी एक गजराजू | सांधी त्यासी उजू होय पाहा ॥१॥
नासिकाचे वारे कोंडोनिया प्राणे | उफराटे जाणे झध्वंपथे ॥२॥
गुदस्थानी टांच देऊनिया जाण | कासावीस प्राण होती पाहा ॥३॥
गोल्हाट भेदिता कोल्हाटीच नाही | विठोबाची ग्वाही नामा म्हणे ॥४॥
