वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080432 · अभंग क्र. ३४२६

3426.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त झाले ॥२॥
मज आता कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानी बहिर झाले ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)चित्तरुपी स्त्री म्हणते मी आता आपला कूळ, आचार, पती, भावे, दीर, घर, सोयरे सर्व विसरले आहे. मी आता लोकलज्जा, भय, चिंता सर्वकाही सोडून दिले आहे परपुरुष असलेल्या अनंताशी माझे चित्त रत झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर आता मला कोणी बोलवले किंवा कोणी माझी समजूत काढण्यासाठी आले तर त्यावेळी माझे कान बहिरे झालेले असतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग