पंढरीचा वास चंद्रभाग
10.
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
हेचि घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरि नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन । जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
