सदगुरुनायके कृपा मज
8.
सदगुरुनायके कृपा मज केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझे सुख मज दाविले डोळा । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावे कवण्या गुणे । जन्मा नाही येणे ऐसे केले ॥३॥
नामा म्हणे निकी दाविली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥
