(व्यभिचारिणी स्त्रीच
3440.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
परपुरुषाचे सुख भोगे तरी । उतरोनि करी घ्यावे सीस ॥१॥
संवसारा आगी आपुलेनि हाते । लावूनि मागुते पाहू नये ॥२॥
तुका म्हणे व्हावे तयापरी धीट । पतंग हा नीट दीपा सोई ॥३॥
अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)जर तुम्हाला परपुरुषाचे सुख भोगायचे असेल तर आपल्या तळहातावर आपले शीर कापून घ्यावे. संसाराला आपल्या हाताने आग लावावी व जळाल्यानंतर संसाराचे काय होते हे पाहाण्यासाठी देखील मागे पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, पतंग जसा दिव्याकडे नीट झेप घेतो व आपला प्राणत्याग करतो त्याप्रमाणे आपण संसाराचा त्याग करण्यासाठी धीट व्हावे तरच आपल्याला श्रीहरीची प्राप्ती होईल.
