वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

कामाचा अंकित कांतेते

🙏 3. संत तुकाराम · ABH-080484 · अभंग क्र. ३२३८

3238.
कामाचा अंकित कांतेते प्रार्थित । तू का हो दुश्चित्त निरंतर ॥१॥
माझी मायबापे बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥धृपद॥
त्यांचे जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥२॥
सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातो तुझी आण निश्चयेंसी ॥३॥
वेगळे निघता घडीन दोरे चुडा । तू तव माझा जोडा जन्माचा की ॥४॥
ताईत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥५॥
वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरू सीण मनी काही ॥६॥
नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जाळिया फुले ॥७॥
तुका म्हणे केला रांडेने गाढव । मनासवे धाव घेतलीसे ॥८॥

अर्थ :
बायकोचा आधीन झालेला तो पती आपल्या पत्नीला म्हणू लागला की तू इतके दिवस इतकी दु:खी होती हे मला माहित नव्हते. पुढे तो म्हणू लागला की माझे मायबाप, बंधू, बहिण तुला एवढा त्रास देतात ना मग मी त्यांचा आताच त्याग करतो यापुढे त्यांचे तोंड जरी मी पाहीन तर मला तुझ्या हत्या केल्याचे पाप लागेल. सकाळी उठलो की लगेच वेगळा निघेन हे मी निश्चयपूर्वक तुझी शपथ घेऊन सांगतो. वेगळा निघालो की मी तुझ्या हातात बांगडया, चुडा व तुला दागीने करेन अरे तू तर माझा जन्माचा जोडा आहेस. गळयात घालण्याचे साखळी, ताईत, दुल्लडी, बाजूबंद, हातात घालण्याची जोडी, वेणीत घालण्याचे जे काही प्रकार आहेत ते सर्व प्रकार मी तुला करीन त्यामुळे तू आता मनामध्ये कोणत्याही प्रकारचा शीण धरु नकोस. अरे तुला चांगल्या भरजरीत नेसण्यासाठी साडया, अंगामध्ये घालायच्या चोळया, शेलरी चुनडी, वेणीत घालण्याच्या जाळया, फुले, खडीची नक्षीदार पातळे हे सर्व आणून देईन. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्य

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग