करूनी विनवणी पायी ठे
38.
करूनी विनवणी पायी ठेवीतो माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥१॥
अखंडित असावेंसे ऐसे वाटते पायी । साहोनि संकोच ठाव थोडासा देई ॥धृ॥
असो नमो भाव आलो तुझिया ठाया । कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया ॥२॥
तुका म्हणे आह्मी तुझी वेडी वांकडी । नामे भवपाश हाते आपुल्या तोडी ॥३॥
