वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्री ज्ञानेश्वर महा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080557 · अभंग क्र. ३३९४

3394.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन । तेव्हा आले जाण फळ त्याचे ॥१॥
नाही तरि वाया केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥धृपद॥
पढोनिया वेद हरीगुण गावे । ठावे ते जाणावे तेव्हा जाले ॥२॥
तपतिर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धि । स्थिर राहे बुद्धि हरीच्या नामी ॥३॥
यागयज्ञादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठी राहे ॥४॥
तुका म्हणे नको काबाडाचे भरी । पडो सार धरी हेचि एक ॥५॥

अर्थ :
ग्रंथाला प्रमाण धरुन किर्तन करावे ग्रंथाचा अभ्यास करावा व नंतर किर्तन करावे आणि किर्तन करताना देवाविषयी आवड निर्माण झाली व समाजात परिवर्तन झाले तर समजावे की आपण केलेल्या ग्रंथाचा अभ्यास फळाला आला आहे. जर ग्रंथाला प्रमाण धरुन किर्तन केले तरच उपयोग आहे नाहीतर ग्रंथप्रमाण धरले नाही आणि किर्तन केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही शेवटी आपल्याला त्याचा त्रासच भोगणे शिल्लक राहील. वेदपठण करावे परंतू हरीचे गुण गाऊन हरीचे गुण गायिल्यानंतर वेदपठण आपण केले तर वेदांचा अर्थ आपल्याला समजेल. तप तीर्थाटन करताना चित्त हरीच्या नामाच्या ठिकाणी स्थिर करावे तरच आपण केलेले कार्य सिध्द होईल. हरीचे नाम जर आपल्या कंठात स्थिर नेहमी राहीले तरच याग, यज्ञ, दान, धर्म इत्यादी कार्य केल्याचे फळ आपल्याला भेटेल. तुकाराम महाराज म्हणतात, हे धरणेकरी ब्राम्हणा अरे तू योगयागातील जप तप या काबाड कष्टाच्या भरीस पडू नको केवळ एक

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग