वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

अनुतापे करी नामस्मरण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086866 · अभंग क्र. ३३७७

3377.
अनुतापे करी नामस्मरण वाचे । तंव मोहिनी येउनी साचे कर धरी ॥१॥
आडवी मोहिनी उगवता दिन । सत्वाचें हरण करु पाहे ॥२॥
मज दिली भाक उगवली आजी । प्रतिज्ञा हे माझी खरी जाली ॥३॥
देई मज आशा सोडी का उदक । सुकृत सम्यक व्रताचें ते ॥४॥
चिंतावला राजा मागे म्हणॆ पाटलासी । इच्छिले पदार्थांसी देईन मी ॥५॥
येरी म्हणे तुझा कुळींचा दीपक । तो देई सम्यक मजलागी ॥६॥
नाही चाड मज पदार्थी अनेका । कापोनियां दे का मस्तकासी ॥७॥
एक जनार्दनी राजिया संकट । न सुचे आणीक कांही तया ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग