उतरला तळी टाकियेली श
3376.
उतरला तळी टाकियेली शय्या । स्नान केले तया शीतोदकें ॥१॥
बैसे घालोनिया तृणाचे आसन । सारी नित्य नेम यथाविधी ॥२॥
नेम भंग जाला वर्जिली मोहिनी । नायके तो ध्यानीं बैसला ॥३॥
एका जनार्दनी अनुतापावांचून । न घडे नामस्मरणं कालत्रयीं ॥४॥
