वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 28. लपंडाई - अभंग १९५ ते १९६

लपंडाई - अभंग १९५ ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087079 · अभंग क्र. १९५

195.
लपंडाई - अभंग १९५ ते १९६

कृष्णा कैशी खेळू लपंडाई । अनंत लोचन तुझे पाही । तेथे लपावें कवणे ठायी । तुझे देखणे लागले पाही ॥१॥
कान्होबा पाववी आपुल्या खुणा ॥धृ.॥
लपुं ममतेच्या पोटी । जेथेंतेथें तुझीच दृष्टी । तेथे लपायाची काय गोष्टी । तुझे देखणे लागले पाठी ॥२॥
लपुं गिरीं कपाटी कडवसा । जेथे तेथे तुझाचि ठसा । एका जनार्दनी सरिसा । तेणे मोडली खेळायाची आशा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग