वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

उदंड शहाणे होवोत तार

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075433 · अभंग क्र. २३१

231.
उदंड शहाणे होवोत तार्किक । परी न कळे अलौकिक महिमा कांही ॥१॥
उदंड वाचन जरी झाले साचे । परी महिमान ययाचे न कळे कांही ॥२॥
उदंड ब्रह्मज्ञान सांगताती गोष्टी । परी अनुभव क सवटी एका नाही ॥३॥
संतांचे उदंड घेताती सोंग । कामनेचा त्याग करिता न ये ॥४॥
उदंड वैराग्य दाखविती जन । परी वासना भोग त्या त्यागिता न ये ॥५॥
किर्तनी सांगती अनुभव गोष्टी । परि धन कांता दृष्टी त्याग नव्हे ॥६॥
चोखा म्हणे हे तो पोटाचे बांधले । म्हणोनी पांगिले घरोघरी ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग