उदंड नागवले वाहावले
232.
उदंड नागवले वाहावले पुरी । ऐसी याची थोरी काय सांगो ॥१॥
ब्रह्मादिक जेणे बहु नागविले । सिध्द ऋ षि भुलविले येणे देखा ॥२॥
इंद्रादि चंद्रा लावियेले काळे । कामाचिया बळे अहिल्येसी ॥३॥
प्रत्यक्ष शूळपाणि तपिया मुगुटमणी । तो हिंडविला वनी भिल्लणीमागे ॥४॥
वृंदेचे घरी विष्णु धरणे करी । अभिलाष करी मने धरिला ॥५॥
चोखा म्हणे येणे बहु नाडियेले ।काय आता बोल याज पुढे ॥६॥
