वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 184. आत्म सुखप्राप्ती विषयी अर्थ उद्गार

विषयो आसक्त जाले माझ

🙏 4. संत नामदेव · ABH-082383 · अभंग क्र. १४२६

1426.
विषयो आसक्त जाले माझे मन न करी तुझे ध्यान पंढरीराया ॥१॥
नाथिले संकल्प करी नानाविध| तेणे थोर खेद पावतसे ॥२॥
आयुष्य सरे परी न सरे कल्पना भोगावी यातना नानाविध ॥३॥
जन्म मरण कष्ट भोगिता संकटी | होतसे हिपुटी येरझारी ॥४॥
ऐसा मी अपराधी दुराचारी देवा | भेटसी केशवा कवणेपरी ॥५॥
मायामोहे सदा प्रांत माझे चित्त | चुकले निजहित नारायणा ॥६॥
तू अनाथा कैवारी ब्रीदावळी हरी सोडवी मुरारी म्हणे नामा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग