मन माझे चोरटे लागले
1425.
मन माझे चोरटे लागले कुसंगी | बांधिले षड्वर्गी धरोनि त्याते |केउता गेलासि माझ्या कृपावंता | ये गा पंढरिनाथा मायबापा ॥१॥
वासनेची बेडी घालोनि माझे पायी | विषयवज्रघायी त्रासिताती |आशा तृष्णा माया आणिक कल्पना | करिताति कामना नानाविध ॥२॥
कामक्रोध दंभ लाविताती कळा | ये माझ्या गोपाळा सोडवणे |* नामा म्हणे माझे घेउनिया चित्त | करि बंधन मुक्त संसाराचे ॥३॥
