मज गांजिल्याचा धांवा
1427.
मज गांजिल्याचा धांवा | सावधान परिसावा ॥१॥
विठो सुजाणाच्या राया | धांव माझ्या करुणालया ॥२॥
माझे मन हे पामर | भ्रांत हिंडे दारोदार ॥३॥
मोहोपाशी मज बांधिले | भेणे वैराग्य साधिले ॥४॥
नामा म्हणे काय करू | तुजविण भूमिभारू ॥५॥
