वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(भुपाळ्यांवरील अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-080478 · अभंग क्र. ३४७५

3475.
(भुपाळ्यांवरील अभंग)
कामे नेले चित्त नेदी अवलोकु मुख । बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय ॥१॥
का गा सासुरवासी मज केले भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ॥धृपद॥
प्रभातेसि वाटे तुमच्या यावे दर्शना । येथे न चले चोरी उरली राहे वासना ॥२॥
येथे अवघे वाया गेले दिसती सायास । तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा ॥३॥

अर्थ :
देवा माझे चित्त विविध प्रकारच्या विषयांकडे जात आहे त्यामुळे ते विषय मला तुमचे मुखदर्शनही होऊ देत नाही व याच कारणाने मला खूप दु:ख वाटत आहे माझे ह्दय फुटू पाहात आहे. हे भगवंता तुम्ही मला संसार सागरामध्ये सासुरवाशीण का केले अहो येथे आपल्या सत्तेने वागण्याचा अधिकार देखील नाही. देवा प्रात:काळी असे खूप वाटते की तुमचे दर्शन घ्यावे तुमच्या दर्शनाला मंदीरात जावे परंतू येथे स्वाधीनता नाही म्हणजेच विविध विषयाने मन बांधलेले आहेत त्यामुळे तुमच्या दर्शनालाही येता येत नाही कितीही विषयभोग भोगला तरीही वासना मागे राहातेच. आता हे मी तुमच्यापासून लपून ठेवणार नाही कारण तुम्हाला सर्वकाही कळते. तुकाराम महाराज म्हणतात, आतापर्यंत मी वासनेचा नाश करण्यासाठी जे जे काही सायास केले ते ते सर्व वायाच गेले असे मला दिसत आहे त्यामुळे माझे आयुष्य आणि देवाची केलेली भक्ती या दोघाचाही नाश झाल्यासारखेच मला दिसते आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग