वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(भुपाळ्यांवरील अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-080462 · अभंग क्र. ३४७६

3476.
(भुपाळ्यांवरील अभंग)
जळोत ती येथे उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥१॥
आता मज साह्य येथे करावे देवा । तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवूनि ॥धृपद॥
भोगे रोगा जोडोनिया दिले आणीका । अरुचि ते हो का आता सकळांपासूनि ॥२॥
तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी । नाही ये लौकिकी आता मज वर्तने ॥३॥

अर्थ :
देवा तुमच्यात व माझ्यामध्ये जो कोणी अंतर निर्माण करेल ते सर्व काही जळून जावोत कारण मी आतापर्यंत जे काही श्रम केलेत ते केवळ तुमच्या पायाचा लाभ व्हावा यासाठीच. देवा आता परमार्थ करण्यासाठी तूच मला साहाय्य करावे आणि सर्व संकटांचा विनाश करुन तुझी सेवा तूच माझ्याकडून करुन घ्यावी. प्रारब्ध भोगाने मला विविध रोगांशी भेट घालून दिली आहे त्यामुळे मला आता संगती नको आहे कोणाविषयी रुची माझ्या मनामध्ये राहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, देवा हे शरीर तुझेच आहे त्यामुळे या शरीराची तूच काळजी घे याचा उदरनिर्वाह करण्याचा भारही तूच तुझ्या मस्तकावर घे मला आता या लौकिकाची आणि शरीराची जोपासना करण्याची काही एक गरज राहिलेली नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग