दीन मी अनाथ तुमचे रं
617.
दीन मी अनाथ तुमचे रंक ।
मागतो भीक मज दयावी ॥१॥
नेऊनि घाला पायांवरी ।
निरवा श्रीहरी कृपाघना ॥२॥
नुपेक्षावे शरणांगता ।
जरी मी नेणता दास तुमचा ॥३॥
निळा म्हणे अवघे संत ।
मिळोनि स्वहित करा माझे ॥४॥
617.
दीन मी अनाथ तुमचे रंक ।
मागतो भीक मज दयावी ॥१॥
नेऊनि घाला पायांवरी ।
निरवा श्रीहरी कृपाघना ॥२॥
नुपेक्षावे शरणांगता ।
जरी मी नेणता दास तुमचा ॥३॥
निळा म्हणे अवघे संत ।
मिळोनि स्वहित करा माझे ॥४॥