वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080922 · अभंग क्र. ३४६८

3468.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
सांडुनिया पंढरीराव । कवणाते म्हणो देव ॥१॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकाते देव म्हणता ॥धृपद॥
सांडुनिया हिरा । कोणे वेचाव्या त्या गारा ॥२॥
तुका म्हणे हरीहर । ऐसी सांडुनिया धुर ॥३॥

अर्थ :
एका पंढरीरायाला सोडून मी दुसऱ्या कोणाला देव म्हणू ? पंढरीरायाला सोडून इतर कोणाला देव म्हणताना माझ्या चित्ताला खूप लाज वाटते. गारा जरी हिऱ्यासारख्या चमकत असल्या तरी हिरा सोडून कोण गारा वेचत बसणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, हरी आणि हर या देवतांना सोडून इतर देवतांची पूजा कोण करेल ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग