चतुर्भुज दिसे शंखचक्
103.
चतुर्भुज दिसे शंखचक्र हाती । मुकूट शोभती सर्वा -लागी ॥१॥
कर्णीची कुंडले वैजयंती माळा । देखतसे डोळा ब्रह्म-देव ॥२॥
कौस्तुभ ह्लदयी श्रीवत्सलांछन । बाहूची भूषणे पाहातसे ॥३॥
चरणी तोडर पीत पीतांबर । तेजे दिवाकर लोपतसे ॥४॥
आपादपर्यंत तुळसीच्या माळा । मुद्रिका दयांगुळा रत्नाचिया ॥५॥
केशराचे टिळे नेत्र कमलाकर । दंती इंदुकर बैसलेती ॥६॥
कोटी-कृष्ण मूर्ति कोटि ब्रह्मे दिसती । स्तवनी स्तविताती सुरवर ॥७॥
नामा ह्मणे ऐसे दावीत गोविंद । झालासे सावध ब्रह्मा तेव्हा ॥८॥
