वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

जाणोनि नेणते नेणत्या

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-089990 · अभंग क्र. ११५

115.
जाणोनि नेणते नेणत्या मागते । आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥
ते स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्ये । नंदासि सौभाग्य भागा आले ॥२॥
जाणते पूर्णता पूर्णता समता । आपण चित्सत्ता गोपवेषे ॥३॥
निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन । दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगे ॥४॥

अर्थ:
सर्व ज्ञानाचा जनिता असलेल्या त्या भगवान कृष्णांने नेणतेपणा स्विकारला व ते गुरु संदिपनांकडे शिकायला गेले. तेच कृष्ण स्वरुप गोळ्यांच्या पुर्वपुण्याईने व नंदाच्या सौभाग्यामुळे गोकुळात आले. सर्व ज्ञानाची पुर्णता व सर्व ज्ञानांची समता ज्याच्यात आहे तो कृष्ण गोपाल वेश धारण करुन गोकुळात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जो सर्व परिणाम तोकडे करत जगतात भरला आहे त्या कृष्णरुप महाधनाचा लाभ मला दिननिशी होत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग