वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

मृगजळाभास लहरी अपार

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090163 · अभंग क्र. ११६

116.
मृगजळाभास लहरी अपार । हा प्रपंच पसारा उदरी जया ॥१॥
ते रूप वैकुंठ कृष्णरूपे खेळे । गोपाळांचे लळे यमुनातटी ॥२॥
जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती । आनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥
निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर । कृष्णचि साचार बिंबलासे ॥४॥

अर्थ:
मृगजळाच्या अमर्याद लाटा प्रमाणे हे मायेच्या पटलात बध्द असलेले ह्या जगताचा पुर्ण पसारा त्याच्या उदरात आहे. तेच रुप कृष्ण रुप घेऊन गोपाळांच्या लळ्यामुळे यमुनातटी वैकुठातुन येऊन कृष्णरुप धरुन खेळत आहे. अग्नीत इंधन टाकल्यावर जशा दशदिशा प्रदीप्त होतात पण तो अनंत स्वरुपातील प्रकाश मात्र एकत्वाने जाणवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच परमात्मा ज्ञानार्काचा सागर बनुन त्या सागराला उदरात धरुन तोच परमात्मा कृष्ण रुपाने साचार होऊन बिंबला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग