वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

वेठी ऐसा भाव । न करी

🙏 3. संत तुकाराम · ABH-080727 · अभंग क्र. ३३६२

3362.
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥
रूप ठसवी न जिवा । अवघा येच ठायी हेवा ॥धृपद॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरी ॥२॥
तुका म्हणे असा । संनिधचि जगदीशा ॥३॥

अर्थ :
मी देवावर वेठबिगारीप्रमाणे भक्तीभाव धरणार नाही आणि वरवर भक्तीचे सोंग देखील दाखवणार नाही. मी माझ्या ह्दयामध्ये देवाविषयी भक्तीभाव दृढ ठसवून घेईन आणि त्याच्याच ठिकाणी मी माझा भक्तीभाव दृढ निश्चयपूर्वक ठेवीन. कृपण मनुष्याचे चित्त जसे पैसावर असते नेहमी तो पैशाचे चिंतन करत असतो त्याप्रमाणे मी देवाचे चिंतन करीन एक क्षण देखील मी देवाचे चिंतन करण्यावाचून राहाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा तुम्ही माझ्या निकटच राहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग