वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १, रूप वर्णन, अभंग १ ते ५७

सुंदर सुरेख वोतीले ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074968 · अभंग क्र. १०

10.
सुंदर सुरेख वोतीले । परब्रम्ह तेज फांकले ।
ते व्योमी व्योम सामावले । नयनी वो माय ॥
कमलनयन सुमन फांकले ।
त्या परिमळा आथिले मकरंदी वो माये ॥
संकोचला संसार । पारूषला व्यवहार ।
ब्रह्मानंद अपार । जाहला वो माय ॥
मधुर वेदवाणी । न पवे ज्याच्या गुणी ।
तै ठकावले निर्वाणी । नेती मुखे वो माय ॥
या परते बोलणे । न बोलणे होणे ।
ते म्या आपल्या अंगवणे । केले वो माय ॥
ऐसी याते वोती । लागले तयाचे पाठी ।
रखुमादेवीवरा भेटी । विठ्ठली वो माय ॥

अर्थ :
नितांत सुंदर अश्या त्याचे तेज परब्रह्म स्वरुपानी पसरले आहे. ते व्योम म्हणजे आकाशा येवढे आकाशभर व्यापले आहे. कमळा सारखे नेत्र व फुला सारखा सुगंध त्याला आहे. त्याचा तो परिमळ व मध ह्यांचा तो एकत्रीत अविष्कार आहे. त्याच्या ठायी संसार संकोचतो, व्यवहार दुर जातो व त्याच्या जवळ फक्त अपार ब्रह्मानंद मिळतो. मधुर वेदवाणी त्याच्या गुणांचे आकलन करु शकत नाही व नेती म्हणत तेथेच विरामते. या बाबत बोलणे हे न बोलणेच होऊन जाते कारण तो ब्रह्मस्वरुपपणे मीच आहे. हे दोन्ही ओठ त्याचे स्मरण करत त्याच्या जणु काही पाठी लागले आहे. तो रखुमाईचा वर विठ्ठलाची मला भेट व्हावी अशी माऊली इच्छा करतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग