हरिहर ब्रह्मा इंद्रा
813.
हरिहर ब्रह्मा इंद्रादिक देव । इच्छिताती सर्व पायधुळी ॥१॥
यांवरी गोपाळ आनंदे नाचती । भूषणे श्रीपती शोभायमान ॥२॥
पाहोनिया सुख आले सर्व देव । पंढरीचा राव पाहावया ॥३॥
नामा म्हणे मिषे गोपाळकाल्याचे । निरंतर वाचे घेत नाम ॥४॥