वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १३. करुणापर अभंग व देवापाशी मागणें

अनाथाची कोण पाववील ह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088809 · अभंग क्र. ५४१

541.
अनाथाची कोण पाववील हाक ।
तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥
मी एक दुर्बळ येतो काकुलती ।
नेणाची श्रीपती काय करु ॥२॥
कोण तुम्हापासी जाणवील मात ।
होऊनि कृपावंत मजवरी ॥३॥
तुम्हासी तो धंदा बहुत बहुतांचा ।
तयामाजिं कैसा आठव माझा ॥४॥
जेथे थोर थोर संत मुनीश्वर ।
सनकादिक सुरवर भीड त्यांची ॥५॥
निळा म्हणे व्यर्थ गेलो वांयांविण ।
केला उरला शिण जन्मवरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग