वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

पावलो जी म्हणे देखिल

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074534 · अभंग क्र. ८१८

818.
पावलो जी म्हणे देखिले जे देखणे ।
गेली आधी तेणे दृष्टी माझी ॥१॥
उचललिया बाह्या क्षेम देईन तया ।
गेली माझी माया देहत्यागे ॥२॥
आनंदे स्फुदत येती अश्रुपात ।
अगा गुरूनाथ देवराया ॥३॥
निवृत्तिदास म्हणे तूते जीवे वोवाळिले ।
शिर निरोपिले तुझ्या चरणी ॥४॥

अर्थ :
परमात्मस्वरूप पाहिले. आणि मी कृतकृत्य झालो. त्या योगाने पूर्वीचा संसार सत्य आहे. अशी दृष्टि नाहीसी झाली. आता मी उचललेल्या बाहूने माझे शरीर अर्पण करीन. शरीर माझे नाही. असे ठरल्याबरोबर त्या शरीरावरील माया म्हणजे मोह आपोआप गेलाच. हे देवादिदेवा श्रीगुरूराया त्या आनंदाने डोळ्यांत अश्रुपात व कंठात स्कुंदन येते. हे श्रीगुरुनिवृत्तिराया, तुम्हाला
जीवाभावाने ओवाळले. आणि मस्तक तुमच्या पायावर ठेविले. असे निवृतिदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग