वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

तुझेनी बळे मांडली फळ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074556 · अभंग क्र. ८१९

819.
तुझेनी बळे मांडली फळी ।
तुवा जवळी असिले पाहिजे ॥१॥
ऐसीये जुंजी घालिसी मज ।
काकुळती तुज नाही आता ॥२॥
रणभूमी आला रणवट घातला ।
पाहो जो लागला न देखे काही ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे उफराटे पाहाणे ।
खुंटले येणे जाणे येची भेटी ॥४॥

अर्थ :
तुझ्या स्वरूपाच्या आश्रयावर ही संसाराची फळी म्हणजे द्वैताचा बाजार मांडला आहे. त्या गर्दीत तू माझ्याजवळ असले पाहिजे. अशा संसाररुपी बाजाराच्या युद्धांत ढकलून देऊन माझ्याविषयी तुला दया येत नाही. धैर्य धरून ह्या संसाररूपी रणभूमीवर मी आलो. आणि संसार म्हणजे काय ते पाहू लागलो. तो संसार दिसेनासा झाला. बहिर्मुख वृत्तिला परत फिरवून परमात्मस्वरूप पाहू गेले असता पाहणेही थांबते व जन्ममरणही नाहीसे होते. याचेच नांव परमात्म्याची भेट
होय असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग