वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 62. हरिनाममहिमा - अभंग १०७१ ते १११९

हरीनामामृत तरले अपार

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084905 · अभंग क्र. १०८१

1081.
हरीनामामृत तरले अपार । व्यास वाल्मिकादि निर्धार तरलें जाण ॥१॥
सेवेचिनि मिसे अक्रूर तरला । उद्धोध जाहला हृदयामाजीं ॥२॥
सख्यत्वयोगें अर्जुन तरला । प्रत्यक्ष भेटला कृष्णराव ॥३॥
दास्यत्व निकटीं हनुमंता भेटी । हृदय संपुटीं राम वसे ॥४॥
नामधारकपणें प्रल्हादु तरला । प्रत्यक्ष देखिला नरहरी ॥५॥
उपमन्यु बाळक दुधाचिया छंदें । तयासी गोविंदे कृपा केली ॥६॥
ऐसे अपरंपार तरलें नामस्मरणी । एका जनार्दनी नाम जपे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग