संत तेची देव संत तेच
211.
संत तेची देव संत तेची देव ।
संत तेचि राव साधनांचे ॥१॥
ऐसा हा निर्धार जयाचे मानसी ।
फळेल तो त्यासी भव नेणे ॥२॥
संत तेचि तप संत तेचि जप ।
संत ते स्वरूप ईश्वराचे ॥३॥
बहेणि म्हणे संत कृपेचे सागर ।
तीर्थाचे माहेर तीर्थरूप ॥४॥
