वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(श्री ज्ञानेश्वर महा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080594 · अभंग क्र. ३४०५

3405.
(श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवविलेल्या धरणेकऱ्यास उपदेश व तुकारामम हाराजांनी त्याला देवाचे वर्णन केलेले अभंग महाफळ म्हणून नारळ रूपाने दिले परंतु त्याने ते न घेता तसेच टाकून तो ब्राह्मण निघून गेला. )
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ । अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥१॥
करील ते काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगी ॥धृपद॥
जया हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे । राहे समाधाने चित्ताचिया ॥३॥

अर्थ :
ज्ञानाचा सागर असलेले जे ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्यांच्या अंगी असे बळ आहे की त्यांनी प्रत्यक्ष रेड्याच्या मुखी वेद बोलविले आहेत. असे हे ज्ञानेश्वर महाराज काय करु शकत नाहीत परंतू साधकाच्या अंत:करणामध्ये परमार्थाचे शुध्द बीज आहे की नाही हे ते पाहात असतात. ज्यांनी मुक्तिछत्र घातले आणि वैष्णवाचा मेळा एकत्र आणला, तुकाराम महाराज म्हणतात, खरे हे धरणेकरी ब्राम्हणा ज्ञानेश्वर महाराजांजवळ सुखाला काय कमतरता आहे त्यामुळे आपल्या चित्ताचे समाधान कर आणि त्यांच्याजवळच आश्रय घेऊन राहा.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग