हीन दीन म्हणोनी का ग
61.
हीन दीन म्हणोनी का गा मोकलिले । परी म्या धरिले पदरी तुमच्या ॥१॥
आता मोकलिता नव्हे नित बरी । थोरा साजे थोरी थोरपणे ॥२॥
शरण आलिया दावितसा पाठी । काय घोर गोष्ठी बानू देवा ॥३॥
सोयरा म्हणे आहे पंढरीनिवासा । तुमचा तो ठसा त्रिभुवनी ॥४॥
