चतुर्भुज श्याममुर्ति
3238.
चतुर्भुज श्याममुर्ति । शंखचक्र ते शोभती । पीतांबर वैजयंती । रुळती गळा ॥१॥
देव देखिला देखिला । तेणे संसाराचा ठावो पुशिला । विदेही तो भेटला । भक्त तयाते ॥२॥
दोघा होतांचि मिळणी । नुरे देव भक्तपणीं । फिटली आयणी । सर्व कोड कठीण ॥३॥
छंद पाहिजे नामाचा । निश्चयो काया मने वाचा । एका जनार्दनी त्याचा । देव होय अंकित ॥४॥
