ब्रह्मादिक देव त्यां
3239.
ब्रह्मादिक देव त्यांचे रंगी नाचती । सनकादिक त्याचे ध्रुपद धरिती ॥१॥
त्यापुढे गीत नृत्य करिती । त्यापुढे मानव केवी ताल धरिती ॥२॥
हरि हरि हरि म्हणता वाचे । हरिरंगी नाचे तोचि धन्य ॥३॥
शास्त्राची व्युप्तत्ती प्रसन्न वागेश्वरी । ती सारजा मुख्य करी नृत्य तेथे ॥४॥
शास्त्र अभिमानें चढला ताठा । मुक्ति ते फुकटा अंतराले ॥५॥
एका जनार्दनी स्वहितीं तू नाचे । बोलणें अभावाचें बोलु नको ॥६॥
