वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

काय मागू विठ्ठल धुरे

🙏 4. संत नामदेव · ABH-082554 · अभंग क्र. १७४३

1743.
काय मागू विठ्ठल धुरे | एक तुळशीदळ पुरे ॥१॥
मागू मुकुट माथाचा | तरी तो आणिला इंद्राचा ॥२॥
मागू कुंडले कर्णीची | तरी ती आणिली कर्णाची ॥३॥
मागू पितांबर शेला | तरी तो कासेसी कसिला ॥४॥
मागू पादुका चरणींच्या | तरी त्या आणिल्या शेषाच्या ॥५॥
मागू तोडर पायींचा | धाक जाईल असुरांचा ॥६॥
मागू जाता लक्ष्मीयेसी | ऋद्धिसिद्धी जिच्या दासी ॥७॥
नामा म्हणे कांही न मागो | तुझे चरणी लक्ष लागो ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग