वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(भुपाळ्यांवरील अभंग)

🙏 3. संत तुकाराम · ABH-080460 · अभंग क्र. ३४७७

3477.
(भुपाळ्यांवरील अभंग)
न सांगता तुम्हा कळो येते अंतर । विश्वी विश्वंभर परिहारचि न लगे ॥१॥
परि हे अनावर आवरीता आवडी । अवसान ते घडी पुरो एकी देत नाही ॥धृपद॥
काय उणे मज येथे ठेविलिये ठायी । पोटा आलो तईपासूनिया समर्थे ॥२॥
तुका म्हणे अवघी आवरीली वासना । आता नारायणा दुसरियापासूनि ॥३॥

अर्थ :
देवा तूम्हांला कोणत्याही गोष्टी न सांगता सर्व कळतात या विश्वाच्या पालनपोषण करणाऱ्या विश्वंभराला त्यामुळे कोणत्याही प्रकारचा परिहार दयावा लागत नाही. परंतू देवा माझ्या अंत:करणात तुमच्याविषयी जी आवड आहे ती माझ्यासाठी अनावर आहे ती आवड मला काही केल्या आवरल्या जात नाही कितीही मी आवरण्याचा प्रयत्न केला तरी एक क्षण देखील मला तुमची आवड स्वस्थ बसू देत नाही. देवा मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून या समर्थांने म्हणजेच तुम्ही मला काय कमी केले आहे मला जे हवे आहे ते तुम्ही बसल्या जागेवरच आणून दिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता नारायणावाचून माझ्या अंत:करणामधील ज्या काही वासना आहेत त्या सर्वांना मी आवरले आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग