वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

(वारकरी परत आल्या नं

🙏 3. संत तुकाराम · ABH-079376 · अभंग क्र. ३६०३

3603.
(वारकरी परत आल्या नंतरचे अभंग)
आले ते आधी खाईन भातुके । मग कवतुके गाईन ओव्या ॥१॥
सांगितला आधी आइको निरोप । होईल माझा बाप पुसे तो ते ॥२॥
तुका म्हणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥३॥

अर्थ :
माझ्या मायबापाने पाठविलेला खाऊ मी आधी खाईन आणि मग कौतुकाने त्यांच्या ओव्या गाईन. माझ्या मायबापाने मला पाठवलेला मी निरोप प्रथम ऐकेन माझ्याविषयी जे जे काही विचारले ते मी प्रथम ऐकेन. तुकाराम महाराज म्हणतात, माझे सखे वारकरी आज माहेराहून म्हणजे पंढरीहून परत घरी आले आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग