वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ३, मंगलचरण तिसरे अभंग ५

पवित्र ते कुळ पावन त

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073111 · अभंग क्र. २२

22.
पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे हरीचे दास जन्म घेती ॥१॥
कर्म धर्म त्यांचे झाला नारायण । त्याचेनि पावन तिन्ही लोक ॥२॥
वर्ण अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगुन मजपाशी ॥३॥
अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने । तयाची पुराणे भाट झाली ॥४॥
वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धार हा चांभार रोहिदास ॥५॥
कबीर मोमीन लतिफ मुसलमान । सेना न्हावी जाण विष्णुदास ॥६॥
कान्होपात्रा खोदु पिंजारी तो दादु । भजनी अभेदु हरीचे पायी ॥७॥
चोखामेळा वंका जातीचे महार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥८॥
नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तिये सवे ॥९॥
मैराळ जनक कोण कुळ त्याचे । महिमान तयाचे काय सांगो ॥१०॥
यातायातीधर्म नाही विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्री ॥११॥
तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणो किती ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग