लग्न संपोदोनी जाली व
6.
लग्न संपोदोनी जाली वरुषे चारी ।
गोत्रजांचा वैरी पिता जाला ॥१॥
वृत्तीच्या समंधे कलह मांडला ।
माझा बोलाविला भ्रतार हा ॥२॥
“गोत्रजांची फेडा बाकीसाकी रीण ।
मागती लिहून सेतमळा ॥३॥
आता येथोनिया जावे परदेसी ।
तरीच आम्हासी सुख होते ॥४॥
तू सखा सोयरा जावई मित्र तू ।
आमुचा हा अंतु पाहू नको ॥५॥
घातलेसे बंदी सोडवील कोण ।
तू सखा होऊन सोडवावे” ॥६॥
मग त्या भ्रतारे काढिले बाहेरी ।
निशीचिया भरी मध्यरात्री ॥७॥
पिता माता बंधू मजही समवेत ।
गेले रातोरात गंगातीरा ॥८॥
प्रवरा-संगमी केले गंगास्नान ।
घेतले दर्शन सिद्धनाथे ॥९॥
बहेणि म्हणे पुढे चालिले तेथोनी ।
पाय वोसंतुनी महादेवा ॥१०॥
