आपुलिया बळे नाही मी
199.
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥२॥
काय म्या पामरे बोलावी उत्तरे । परि त्या विश्वभरे बोलविल ॥३॥
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । वागवी पांगुळा पायांविण ॥४॥
